झुंजार सेनापती l बीड । प्रतिनिधी
श्री मन्मथ स्वामी महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत बंकटस्वामी महाराज,संत महादेव बाबा, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत ज्ञानेश्वर माऊली यासारखे अनेक संत जिल्ह्यात होऊन गेले. अनेक वर्षाचा कालखंडामध्ये त्यांनी कीर्ती केली.
महाराष्ट्रामध्ये दोनच संत असे होऊन गेले की, त्यांनी संजीवन समाधी घेतली. ’संत ज्ञानेश्वर’ आणि ’संत मन्मथ स्वामी’ मन्मथ स्वामी यांची गेल्या 450 वर्षां पासून कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ’श्रीक्षेत्र कपिलधार’ महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ओळखले जाते.श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त अखंड शिवनाम सप्ताहाचे प्रारंभ दिनांक 9-11-2024 रोजी करण्यात आला असून या सप्ताहामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरातून गायक, वादक तसेच शिवकिर्तनकाराचे व भाविक भक्तांची उपस्थिती असते यामध्ये भजन, शिवकिर्तन, शिवपाठ, काकडा, भारुड, श्रीची महापूजा अन्नदान व शेज आरती तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे व महा प्रसादाचे आयोजन करण्यात येते. येणार्या 15 नोव्हेंबर ला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध राज्यातून पायी दिंडीयांचे आगमन होते . तसेच अनेक राज्यातून शेकडो दिंड्या या ठिकाणी येतात. हा परिसर अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहे. त्यामुळं येणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी आल्यावर समाधान व्यक्त करतो. आणि सर्व समाज एकत्र करून एक विचार या ठिकाणावरून घेऊन जातात.
या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकभक्तांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान पंचकमेटी, श्रीक्षेत्र कपिलधार येथील पुजारी विश्वनाथ बापू स्वामी, डॉ. त्रिंबक नागनाथ स्वामी कपिलधार, वैजिनाथ महाराज शिंदे दत्तसंस्थान बालाघाट यांनी केले आहे.
450 वर्षांपूर्वी श्री मन्मथ स्वामी यांचा जन्म माघ शुद्ध पंचमी 1482 ला झाला.
जगाला पवित्र करण्याचे सामर्थ्य या वीरशैव कुळामध्ये आहे. त्याच कुळामध्ये 450 वर्षांपूर्वी श्री मन्मथ स्वामी यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी मन्मथ स्वामी यांच्या आई पार्वती आणि वडील शिवलिंग स्वामी यांच्या पोटी झाला. मन्मथ स्वामी यांचा जन्म दिनोदर बाबा यांच्या आशीर्वादाने झाला होता. त्यांनी शिव सांप्रदायाचा पाया रोवाला तसेच लिंगायत वीरशैव साहित्याचे व समाजाचे ते जनक आहेत. भजन कीर्तन नामस्मरण ही परंपरा त्यांनी चालू केली. तसेच मन्मथ माऊलींनी शिव संप्रदायाचा पाया रचला व क्लस हा शिवसंत लक्ष्मण महाराजांनी रचला. लक्ष्मण महाराजांची समाधी जोड आष्टी येथे आहे. मन्मथ माऊलींनी पहिली ध्वज पताका खांद्यावर घेऊन कपिलधार ते शिखर शिंगणापूर पदयात्रा काढली.
*या ठिकाणची आख्यायिका*
या ठिकाणी कपिल मुनी यांचं वास्तव्य होतं. कपिल मुनी यांची गंगासागर येथे समाधी आहे. कपिल मुनी हे तपस्वी असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र दिनोदर बाबा यांच्या ओटीमध्ये टाकलं म्हणजे त्यांना दान केलं. दिनोदर बाबा हे एक तपस्वी महाराज होते. ते या ठिकाणी असलेल्या पंचकुंडाच्या ठिकाणी गुप्त झाले. त्याअगोदर दिनोदर बाबा यांनी हे तीर्थक्षेत्र मन्मथ स्वामी यांना स्वाधीन केलं होतं. मन्मथ स्वामी यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून वयाच्या 26 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली.
*संजीवनी समाधी घेणारे महाराष्ट्रातील दुसरे संत*
मन्मथ स्वामी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या कपिलधार या ठिकाणी गेले. 459 वर्षापासूनची ही परंपरा व लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. संजीवनी समाधी घेणारे हे महाराष्ट्रातील दुसरे संत म्हणून ओळखले जातात. मन्मथ स्वामी यांनी ’परम रहस्य’ हा ग्रंथ कपिलधार या ठिकाणी लिहिला. त्यावेळी त्याठिकाणी दुसरं प्राणी देखील वास्तव्यास होते. अनेक वाघ, सिंह, साप या ठिकाणी वास्तव्य होते. ज्यावेळी मन्मथ स्वामी त्या ठिकाणी तपश्चर्या करत असत त्यावेळी त्यांच्या अंगा खांद्यावर साप खेळत असत असा त्यांचा अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे.
———