spot_img
22.8 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

spot_img

महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालू देणार नाही !

प्रा. अशोक बागवे

झुंजार सेनापती l पनवेल
‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’, असे संतश्रेष्ठ  तुकाराम महाराज म्हणतात. मात्र, सद्य:परिस्थिती पाहता  आम्हाला लहानपण पुन्हा देवू नका. कारण, आता आम्हाला पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकावी लागेल. भाषा कुठलीही वाईट नाही. कुठल्याही भाषेबद्दल आम्हाला अनादर नाही. मात्र, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालू देणार नाही, असा इशारा संमेलनाध्यक्ष कवीवर्य प्रा. अशाेक बागवे यांनी देऊन  राज्य सरकारच्या ‘त्या’ सचिवांचा निषेधाचा ठराव संमेलनात मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर केला. पनवेल येथील साहित्य संमेलनात ते बोलत होते.अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोक बागवे पुढे म्हणाले,  आपल्यावर ब्रिटिशांनी दिडशे वर्ष राज्य केले. मात्र, इंग्रजी भाषा  आजही मराठी माणसांवर राज्य करत  आहे. तरीही  आम्ही सहन करत आहाेत. इंग्रजी ही ज्ञानाची खिडकी असायला काही हरकत नाही. पण मराठी भाषा ज्ञानाचा दरवाजा असायला हवा. दरवाजाने यजमान माणूस  आत येताे, तर खिडकीवाटे येताे, त्याला चाेर म्हणतात, अशी काेपरखळीही प्रा. बागवे यांनी केली.

कानडा राजा पंढरीचा असल्याने आम्ही कानडी भाषा स्वीकारली आहे. ‘माेरावर चाेर’ या म्हणीचा प्रत्यक्षात माेर आणि चाेर यांच्याशी काहीही संबंध नाही. मुळात हे शब्द मल्याळम भाषेतील आहे. माेर्रर् म्हणजे भात आणि चाेर्रर् म्हणजे ताट. मात्र, आपण तेही स्विकारले, असेही प्रा. बागवे म्हणाले.
आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत शाैर्य आणि वैराग्य हातात हात घालून चालत अाले अाहेत. साेळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज शाैर्य दाखवत हाेते, त्याचवेळी त्यांच्यासाेबत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज अाणि समर्थ रामदास स्वामीही हाेते. त्या काळाची आठवण संमेलन घेताना  आम्हाला नेहमी हाेते, अशी कबुली प्रा. बागवे यांनी प्रांजळपणे दिली.
महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपल्या नाळेशी जाेडलेली आहे ज्या नाळेतून अापला जन्म हाेताे, त्या नाळेच्या भाषेशी संलग्न असणे, यालाच मातृभाषा म्हणतात. त्यामुळे मराठी भाषेचा गाैरव करण्यासाठी संमेलन अायाेजित करणे  आवश्यक  आहे. महाराष्ट्राची भूमी ही नदीने ताेडलेली आहे, तर माणसांनी जाेडलेली  आहे. मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायला हवा. कारण या भाषेच्या एका शब्दाने हजारो रंगछटा आपल्याला मिळतात. जसे एकाच मातीत फणस, पेरू अाणि चिकूची झाडे असतात. तसेच साहित्यिक, शिल्पकार, रंगकर्मी यांना जाेडणारी माती ही मराठी भाषा अाहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनात प्रत्येक घटकाने सहभाग घ्यायला हवा, असे अावाहन प्रा. अशाेक बागवे यांनी केले.
कलेचे विश्व हे माणसाला माणूस बनवणारे  आहे. नराचा नारायण करणे म्हणजे साहित्य संमेलन. ते करण्यासाठी साहित्य संमेलनाचा घाट घातला अाहे. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलनाला कांतीलाल कडूंसारखा स्वागताध्यक्ष लाभावा’, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गर्वाने नाही तर अभिमानाने सांगा मी मराठी अाहे. कारण, गर्वाचे घर नेहमी खाली असते. त्यामुळे कुठला शब्द कुठे वापरायचा याचे भान असायला हवे. मराठी भाषा खूप समृद्ध अाहे. अापली माता गराेदर हाेते तर म्हैस गाभण हाेते, याचे  आैचित्य जी भाषा सांभाळते, तिला ‘मराठी भाषा’ म्हणतात. या मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी  आपले रक्त, अश्रू, घाम  आणि श्वास हे चार वेद पेरलेले  आहेत. त्यांचे स्मरण करण्यासाठी साहित्य संमेलन घेतले जातात, अशी महती प्रा. बागवे यांनी सांगितली.
सत्यम शिवम‌् सुंदरम‌् ही भारताची ित्रगुणात्मक मुल्ये अाहेत. सत्यम म्हणजे विज्ञान, शिवम म्हणजे नीती अाणि सुंदरम म्हणजे कला. महाराष्ट्राची ित्रगुणात्मक शक्ती  आहे दया, क्षमा अाणि शांती. ‘दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती’ असे असताना करुणा जागृत करणारे वाड्मय असते. तुमचे ह्रदय एखाद्या अाेळीने पाझरते, तेव्हा डाेळ्यात अश्रू येतात. अश्रू अाणि हसू हे कुणालाही निर्माण करता येत नाहीत. बागेत सकाळी खाेटं हसणाऱ्यांना पाहून जे अापल्याला हसू येते ते खरं अाहे. त्याचपद्धतीने वाड्मयकार अाणि कवी हे सत्य बाेलणारे असतात. सत्य दडवणारे सगळे लाेक पांढरे कपडे घालून दिल्लीला जातात. पण सत्य सांगणारे लाेक रसिकांसमाेर कवी संमेलन करतात, असे चिमटे प्रा. बागवेंनी राजकारण्यांना काढले.
प्राण्यांचे  आयुष्य पाेट भरल्यावर संपते, तर माणसाचे  आयुष्य पाेट भरल्यावर सुरू हाेते  आणि माणसाचे  आयुष्य चांगल्या पद्धतीने सुरू हाेण्यासाठी कलेचा अास्वाद, रसास्वाद, वाड्मयाची गरज असते. या सगळ्या कला माणसाला समृद्ध करतात. त्यामुळे सरकारने नवाेदित कलाकार, कवींना संधी दिली तर  आम्हाला संमेलन भरवण्याची गरज लागणार नाही. सरकारने फक्त पुरस्कार देवू नयेत तर ‘तिरस्कार’ही द्यावा, अशी कोपरखळी त्यांनी राज्य सरकारला दिली..
शेवटी पसायदान आपण म्हणताे. पसाय म्हणजे अमृताचे दान. जे आपल्याला आईकडून मिळते.  आईचे उदर म्हणजे भूगाेल  आणि वडील म्हणजे इितहास. भूगाेल आणि इतिहास जाे विसरताे, ताे दिल्लीला घसरतो. त्यामुळे  आपण अापली भूमी, शब्द, साहित्य, मित्रावर प्रेम करायचे असते. कारण संमेलन हे भावनांना जाेडलेले असते, असे पाेटतिडकीने अध्यक्षीय भाषण
प्रा. बागवे यांनी केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचादर्जा देवून उपकार केले नाहीत !

अभिजात म्हणजे काय? ज्यांनी दिले त्यांना तरी माहित अाहे का? ४०० काेटी रुपये केंद्राने दिलेत, ते मिळालेत का? ते कुठे खर्ची केले? असा प्रश्न प्रा. बागवे यांनी उपस्थित करून अभिजात भाषेची व्याख्या सांगितली. ज्या भाषेला मरण नाही, जी अक्षय्य असते, जी मुळाग्राही असेत. जिची मुळे खाेलवर रुजलेली अाहेत, तिला अभिजात म्हटले जाते. माझी माय अभिजात अाहे, हे शेजाऱ्यांना कशाला िवचारायला जावू? माझे ज्ञानाेबा, तुकाेबा, केशवसूत, कुसुमाग्रज हे सर्व अभिजातच अाहेत. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून उपकार केले नाहीत, अशी कानउघाडणी केंद्र सरकार अाणि राज्य सरकारमधील नेत्यांची प्रा. बागवे यांनी केले.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!