spot_img
spot_img

नवी मुंबईवर भाजपचा झेंडा; सुजाता पाटील महापौर, तर उपमहापौरपदी दशरथ भगत

झुंजार सेनापती l मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. शिवसेना (शिंदे गट) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक औपचारिक ठरली आणि भाजपचे दोन्ही उमेदवार कोणतीही चुरस न होता विजयी झाले. या निवडीमुळे नवी मुंबईच्या सत्ताकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी महानगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली. विरोधकांकडून कोणताही वैध अर्ज शिल्लक न राहिल्याने सुजाता पाटील आणि दशरथ भगत यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभागृहात भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला.

Related Articles

Οδηγός για την πρώτη σας εγγραφή στο bizzo casino online

Αυτός ο οδηγός έχει σχεδιαστεί για να σας καθοδηγήσει στη διαδικασία της πρώτης σας εγγραφής στο bizzo casino online. Θα καλύψουμε όλα τα βήματα...

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा वाचवण्यासाठी छत्रपती घराण्याने पुढाकार घ्यावा!

झुंजार सेनापती l मुंबई  छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानासाठी वंदनीय आणि प्रेरणास्थान आहेत. मात्र त्यांच्या पुतळ्यांच्या आडून काही समाजकंठक आणि राजकीय स्वार्थी घटक आपले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!