spot_img
spot_img

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई

महाराष्ट्र शासनगृहविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक ०११२/२८७//प्र.क्र.७८/विशा/१अ/दि. १ जानेवारी २०१५ अन्वये प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सूचित केले आहे. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर व अंधेरीबोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयाच्या आदेशानुसार समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

२६ जानेवारी१५ ऑगस्ट१ मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रममहत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्याच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब तसेच कार्यक्रमाच्या आणि अन्य ठिकाणी इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तहसील कार्यालयात व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटना यांना शासन आदेश दि. १ जानेवारी २०१५ अन्वये सुपुर्द करण्यात आलेले आहेतअसे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!