spot_img
spot_img

मुंबई पोलीसांच्या घरांसाठी शिवसेना मैदानात

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईत तीस ते चाळीस वर्षे पोलीस दलासाठी आयुष्य झोकून सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शिवसेना भवन येथे पोलीस पत्नींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आदित्य ठाकरे  प्रमुख उपस्थित होते. बैठकीत पुनर्विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंबईची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळावीत यासाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. जसे बीडीडी चाळी आणि तेथे राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात आले, तसेच हे स्वप्नही निश्चित साकार करू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

Related Articles

Les innovations du Stake casino en ligne qui changent la donne en France

Dans cet article, nous allons explorer les innovations fascinantes du casino en ligne stake qui transforment l'expérience des joueurs en France. De la diversité...

अवैध दारू दुकाने तात्काळ बंद करण्याची पोलिसांकडे मागणी

⬤ झुंजार सेनापती l बीड | प्रतिनिधी : बीड तालुक्यातील अंधापुरी गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!