spot_img
spot_img

मुंबई–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांना मेट्रोने जोडणार

मेट्रो लाईन–८ च्या ३५ किमी मार्गिकेला मंत्रिमंडळाची मान्यता

झुंजार सेनापती l मुंबई (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन–8 च्या 35 किलोमीटरच्या मार्गिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई–नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
या बैठकीत नाशिक शहर परिक्रमा मार्ग तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव मोर ते सुरजागड चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीसही मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की,
“कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी भूसंपादनासह सर्व परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. भूसंपादनानंतर तीन वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील.”
ते पुढे म्हणाले की, प्रकल्प विलंबित झाल्यास खर्चात वाढ होते, त्यामुळे कामे रेंगाळू नयेत. नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
‘ऑटो मोड’ प्रणाली लागू करण्याचे निर्देश
प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन आणि विलंब झाल्यास दंड आकारण्याची ‘ऑटो मोड’ यंत्रणा विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच गडचिरोली महामार्गाच्या कामात भविष्यातील गॅस वाहिनीसाठी रस्त्यालगत जागा राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, एमएसआयडीसीचे ब्रिजेश दीक्षित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले.
पायाभूत प्रकल्प ठळक मुद्दे
■ मेट्रो लाईन–8 (मुंबई–नवी मुंबई विमानतळ)
एकूण लांबी : 35 किमी
भूमिगत मार्ग : 9.25 किमी
उन्नत मार्ग : 24.636 किमी
एकूण स्थानके : 20
भूमिगत : 6
उन्नत : 14
टर्मिनल–2 (CSMIA) ते घाटकोपर (पूर्व) : भूमिगत
गोवंडी (प.) ते नवी मुंबई विमानतळ टर्मिनल–2 : उन्नत
भूसंपादन : 30.7 हेक्टर
भूसंपादन खर्च : ₹388 कोटी
एकूण प्रकल्प खर्च : ₹22,862 कोटी

Related Articles

Celebrate with Supabets Birthday Bonus and Enhance Your Betting Fun

In the world of online betting, few promotions capture players' excitement quite like the Supabets Birthday Bonus. This article will explore how this special...

शिवपुतळा वादावर मोठा तोडगा; स्थलांतराच्या निर्णयाने तणावाचा शेवट

झुंजार सेनापती l प्रतिनिधी  माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरून पेटलेला वाद अखेर शांततेच्या मार्गाने निकाली निघाला असून चौथ्याच दिवशी गाव...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!