spot_img
spot_img
spot_img

रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात मोठे बदल उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक

झुंजार सेनापती l मुंबई 

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर  (१ फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून लोकल सेवांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद व अर्ध-जलद लोकल फेऱ्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
या गाड्या कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. नियोजित थांब्यांव्यतिरिक्त अतिरिक्त थांबे देण्यात येणार असल्याने या गाड्या सुमारे १० मिनिटे उशिरा धावतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद व अर्ध-जलद लोकल फेऱ्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्याही ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून वळविण्यात येणार आहेत.
दरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील. सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान वाशी–बेलापूर–पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल तसेच पनवेल–बेलापूर–वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहतील.

Related Articles

बारामती अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय; व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट

झुंजार सेनापती l मुंबई  बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश...

टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!