spot_img
spot_img

भूमिपुत्रांच्या लढ्याला यश? दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्ली दरबारी

नवी दिल्ली : झुंजार सेनापती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केली.
भिवंडीचे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी विमानतळाच्या नामकरणासंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मंत्री मोहोळ म्हणाले की, सामान्यतः विमानतळांना संबंधित शहराच्या नावाने ओळखले जाते. मात्र राज्य सरकारने विधिमंडळाच्या ठरावासह वेगळ्या नावाचा प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार केला जातो. त्यानंतर संबंधित मंत्रालये आणि विभागांशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेतला जातो.
मोहोळ यांच्या स्पष्टीकरणामुळे नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावाने होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. या नावासाठी भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली असून खासदार म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवल्याने या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!