झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील
मत्स्य व्यवसायाला अधिक बळ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी केले. वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थेत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना तसेच मत्स्य व्यवसायाला देण्यात आलेला कृषी समकक्ष दर्जा आणि त्याअनुषंगिक सवलती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना व मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजनांच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
कार्यशाळेला मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रामास्वामी एन., मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मनोज शर्मा तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



