spot_img
spot_img

“गृहमंत्री झोपलेत का?” नांदेडमध्ये रक्ताचा खेळ; तीन दिवसांत पाच खून,पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी!

झुंजार सेनापती l प्रतिनिधी
नांदेड शहरात सुरू असलेल्या खुनांच्या मालिकेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघ्या तीन दिवसांत पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने नागरिक संतप्त झाले असून “गृहमंत्री झोपलेत का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये वर्चस्वाच्या वादातून भीषण रक्तपात झाला. या तिहेरी हत्याकांडात अर्जितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज यांचा जीव गेला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्ली येथे रज्जुसिंघ तबेलेवाले याची हत्या करण्यात आली. इतक्यावरच न थांबता आज सकाळी सोनू कल्याणकर या तरुणाचाही खून करण्यात आला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांचा पोलिसांवर कोणताही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदेडमध्ये निर्माण झालेल्या या भयावह परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण असून प्रशासनाविरोधात संताप उसळला आहे. तात्काळ कठोर कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Was Sie über den Beef Casino No Deposit Bonus wissen müssen

In diesem Artikel erfahren Sie alles Wichtige zum Beef Casino No Deposit Bonus. Wir werden die verschiedenen Aspekte dieses Angebots beleuchten, einschließlich der Vorteile,...

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!