spot_img
spot_img

मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का?

तटकरेंचा पलटवार

 मुंबई l झुंजार सेनापती 
अजित दादा पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “दगड चिखलात मारणं म्हणजे आपल्या अंगावरच चिखल उडवणं,” असं म्हणत त्यांनी कदमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा सूर लावला.
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर “गलिच्छ राजकारण” केल्याचा आरोप करत सुनेत्रा पवारांना घाईघाईत शपथ देण्यात आल्याची टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, “रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर मला जास्त बोलायचं नाही. टीका करायची असेल तर त्यांनी जरूर करावी. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत ४१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पक्षाचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे.”
तटकरे यांनी यावेळी कदमांच्या पक्षांतरावरही अप्रत्यक्ष टोला लगावला. “रामदास कदमांनी मातोश्री का सोडली? नंतर इतरांची साथ का धरली? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कधी त्याबद्दल विचारलं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला

Related Articles

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!