spot_img
spot_img

अंबादास दानवेंची ‘वाय प्लस’ काढली

झुंजार सेनापती l मुंबई

अंबादास दानवे यांना देण्यात आलेली ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतली आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे नियतकालिक पुनरावलोकन करणाऱ्या समितीच्या अहवालानुसार गृह विभागाने हा निर्णय घेतल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी सुमारे पाच महिन्यांपूर्वी संपुष्टात आला आहे. तसेच ते सध्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरही नाहीत. पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सुरक्षेचे पुनर्मूल्यांकन करण्याची पद्धत असून, त्यानुसारच त्यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा मागे घेण्यात आल्याचे गृहमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना धोका मूल्यांकनाच्या आधारे विविध स्तरांवर सुरक्षा पुरवली जाते. ‘वाय प्लस’ सुरक्षा श्रेणीत सशस्त्र पोलीस जवान, एस्कॉर्ट वाहन आणि इतर सुरक्षा उपायांचा समावेश असतो. मात्र, पद व धोका पातळी यानुसार ही सुरक्षा वेळोवेळी बदलली जाते.
दरम्यान, दानवे यांची सुरक्षा काढल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आक्रमक भूमिका मांडणारे नेते म्हणून दानवे यांची ओळख आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!