spot_img
spot_img

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून कोल्हापुरात मोठा राडा

कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारला

झुंजार सेनापती l प्रतिनिधी 
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून उबाठाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची निवड जाहीर होताच पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. संतप्त कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या घरी जाऊन जाब विचारत तीव्र घोषणाबाजी केली.
परिवहन समितीतून विशाल देवखुळे यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. मोदी यांनी पक्षाचा घात केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काँग्रेसचे हस्तक झाल्याचा गंभीर आरोप केला. “पक्षात राहून पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे,” अशी टीका संतप्त गटाकडून करण्यात आली.
मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. “गुलाल धुवून या आणि मग आमच्याशी बोला,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत उबाठाचा वापर करून घेतला, अशा आरोपांसह आघाडीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला.
दरम्यान, दोन स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरूनही पक्षात आधीपासूनच मतभेद होते. सुनील कदम यांनी काही नावांवर आक्षेप घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर उबाठामधील गटबाजी उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे

Related Articles

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चा कोनशिला समारंभ संपन्न

झुंजार सेनापती l  पुणे लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती...

१ मेपासून मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाने रद्द होणार

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मोटार परिवहन विभागाच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!