spot_img
spot_img

नागपूर, विदर्भ आणि मध्यभारताच्या विकासाचे इंजिन म्हणून नागपूर विमानतळ नावारूपाला येणार

झुंजार सेनापती l मुंबई, दि. २६ : नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात आयोजित विमानतळ हस्तांतरण सोहळयात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात नवनवीन विमानतळ उभारले जात असताना नागपूर विमानतळ मोठे व सुंदर करण्याचा आम्ही संकल्प केला. २०१८ मध्ये यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या. २०१९ मध्ये जीएमआर कंपनी पात्र ठरली होती. मात्र या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि अखेर सकारात्मक निर्णय आला. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला व केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली आणि आज रीतसरपणे या विमानतळाच्या आधुनिकीकरण,  विस्तार आणि विकासाच्यादृष्टीने जीएमआर कंपनीला विमानतळ हस्तांतरण करण्यात आले आहे.

या विमानतळावर प्रवासी व कार्गो वाहतूक होण्यासाठी दोन टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या होणे गरजेचे आहे. हस्तांतरणांमुळे आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळाला मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विमानतळाचा विस्तार लक्षात घेऊन येत्या काळात  सुयोग्य कनेक्टिव्हिटी देण्याच्या दिशेनेही समांतर कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या एक वर्षात या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशाला येथील सौंदर्य आणि सुविधेत अभूतपूर्व बदल दिसावा असे काम व्हावे. तसेच २०२९ पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाकडून मिहान आणि एमआयडीसी अंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर व परिसर आणि विदर्भात होत असलेला उद्योग क्षेत्राचा विकास शेजारील तेलंगणा, छत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांनाही मोठा फायदा होऊन या भागाच्या आर्थिक विकासासाठी हे विमानतळ महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्री  फडणवीस यावेळी म्हणाले.

Related Articles

महिलांच्या सुरक्षित कार्यस्थळासाठी पॉश कायद्याची अंमलबजावणी आणखी कडक

⬤ झुंजार सेनापती l मुंबई, दि.२६ : राज्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी 'पॉश' (POSH)...

कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार

झुंजार सेनापती l मुंबई, दि. २६  : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोळंबी पालन व्यवसायाच्या विस्ताराला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!