spot_img
spot_img

मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी १,२४० कोटींची तरतूद

– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

मुंबईची ओळख असलेल्या ससून गोदीचा येत्या तीन वर्षांत कायापालट करून देशातील आदर्श मत्स्यबंदर म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मच्छीमारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक, आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि महिला मच्छीमारांची सुरक्षा यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

राज्यातील मच्छीमार समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासनाच्या पहिल्या १०० दिवसांत मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करून मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी १ हजार २४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिला मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान

ससून गोदीतील महिला मच्छीमारांना वितरित करण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी तमिळनाडू आणि इंडोनेशियातील तज्ज्ञांशी चर्चा सुरू असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन संशोधनाच्या मदतीने महिला मच्छीमारांचे काम अधिक सुरक्षित व सुलभ करण्यावर भर दिला जात आहे.

प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

ससून गोदीतील विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गोदीतील मच्छीमारांच्या प्रलंबित समस्या सोडवून व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि मच्छीमारांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांच्या माध्यमातून गोदीचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.

येत्या तीन वर्षांत ससून गोदीचा चेहरामोहरा बदलून देशातील आदर्श मत्स्यबंदर विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

दोन गुजराती महाराष्ट्र चालवणार ? सह्याद्रीच्या विनाशावरून राज ठाकरे संतप्त!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई टोरंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत येथील सभेत राज्य सरकारवर...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५०० क्षमतेची वसतिगृहे; १५ जिल्ह्यांत एक रुपयात जागा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा जपणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील फुलेवाडा आणि...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!