spot_img

शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार धैर्यशील माने यांची दिवाळी

⬤ झुंजार सेनापती l  कोल्हापूर 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी त्यांनी ग्रामस्थांसोबत झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला, तसेच महिलांना दिवाळी फराळाचे वाटप केले.

यावेळी ग्रामस्थांनी रस्ते, पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, एसटी बस, वीजपुरवठा, सातबारा आणि वन्यप्राण्यांच्या त्रासासह विविध समस्या व उपाय योजनाबाबत चर्चा केली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार माने यांनी दिली. नवीन गाव तलावाचा प्रस्ताव तयार करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच बळवंत मुगडे, बाबा लाड, चंद्रकांत मुगडे, अतिश शिंगे, संभाजीराव देसाई, ओमकार चौगुले, दादासाहेब गावडे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत खासदार माने यांनी साधेपणाने साजरी केलेली दिवाळी ग्रामस्थांसाठी आनंददायी ठरली

 

Related Articles

मंत्री प्रताप सरनाईक यांची पानखंडा येथे आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी

⬤ झुंजार सेनापती l ठाणे दीपावलीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात असताना, संकटांचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी व...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी शासन सदैव तत्पर!

⬤ झुंजार सेनापती l  रायगड-अलिबाग  आईच्या निधनानंतर गेल्या १० ते १२ वर्षांत दिवाळीचा सण मनापासून गोड वाटला नव्हता. मात्र, कर्नाळा येथील कलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!