spot_img

आदिवासी पाड्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची दिवाळी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

जळगाव, दि. ९ : दीपावलीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि सणाच्या उत्साहात कोणीही वंचित राहू नये, या भावनेतून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील बोरमळी येथे आदिवासी बांधवांसोबत सहपरिवार दिवाळी साजरी केली. या उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या नात्यांचा संदेश दिला.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आदिवासी पाड्यावरील बंधू-भगिनींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांच्या भेटीला आलेल्या महाजन यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदावी, या भावनेतून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. फराळ वाटप आणि स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंत्री महाजन यांनी आदिवासी बांधवांशी आपुलकीचे नाते जपले. त्यांच्या या भेटीमुळे आदिवासी पाड्यावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरे करण्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. मंत्री महाजन यांच्या सहवासामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते.

यावेळी आमदार अमोल जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी, आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा शेतकऱ्यांना दिलासा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई एका बाजूला दुष्काळाच्या झळा, दुसऱ्या बाजूला डोळ्यांसमोर वाळून गेलेली पिके, शेतीसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया गेल्याने डोळ्यात पाणी… अशा स्थितीतील...

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आता पालावरच शाळा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर पोहोचत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!