spot_img
spot_img

अजित पवारांचा अपघात संशयाच्या भोवऱ्यात

मिटकरींच्या सवालांनी तपासावर वादळ

झुंजार सेनापती l मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. मात्र या अपघाताबाबत काही गंभीर शंका उपस्थित केल्या जात असून, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनीही भावना व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
मुंबईहून बारामतीकडे जात असलेले विमान बारामती विमानतळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर कोसळले. 
या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे, “आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.”

 या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करत अपघातासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत:

अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले?
सहावी व्यक्ती कुठे गेली?
टेक-ऑफपूर्वी प्रवासी यादी डिजिटल नोंदली जाते, मग विसंगती का?
एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?
एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
“प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय आणि प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही,” असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Die besten Zahlungsmethoden bei Slotexo Casino Deutschland für schnelle und sichere Transaktionen

In diesem Artikel werden wir die besten Zahlungsmethoden bei Slotexo Casino Deutschland genauer unter die Lupe nehmen. Wir möchten Ihnen die verschiedenen Optionen vorstellen,...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!