spot_img
spot_img

जिल्हा परिषद मतमोजणीकडे राज्याचे लक्ष

आज निकाल

झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार असून ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले आहेत.
दुपारपर्यंत बहुतांश निकालांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी ७,४३८ उमेदवार रिंगणात असून अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांत एकूण ६८.२८ टक्के मतदान झाले.
परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ७४.८९ टक्के मतदानाची नोंद झाली, तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी ५५.७९ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

“गृहमंत्री झोपलेत का?” नांदेडमध्ये रक्ताचा खेळ; तीन दिवसांत पाच खून,पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी!

झुंजार सेनापती l प्रतिनिधी नांदेड शहरात सुरू असलेल्या खुनांच्या मालिकेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघ्या तीन...

Celebrate with Supabets Birthday Bonus and Enhance Your Betting Fun

In the world of online betting, few promotions capture players' excitement quite like the Supabets Birthday Bonus. This article will explore how this special...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!