spot_img
spot_img
spot_img

मंत्रालयातील लाचखोरीवरून विरोधक आक्रमक

झिरवाळांच्या राजीनाम्यासाठी सभागृहाबाहेर ठिय्या

झुंजार सेनापती | सोमनाथ पाटील 
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील कथित लाचखोरी प्रकरणावरून विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन छेडले. कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
“फाईल हलते, पैशाने मंत्रालय चालते”, “हप्त्याने भ्रष्टाचार”, “भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “मंत्रालयात लक्ष्मीदर्शन – झिरवाळ राजीनामा द्या” अशा आशयाचे फलक यावेळी झळकवण्यात आले. मंत्रालयातील गैरप्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून झिरवाळ यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी विरोधकांनी केली.
आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते  आमदार . विजय वडेट्टीवार, आमदार आ.सतेज पाटील यांच्यासह इतर विरोधी नेते सहभागी झाले होते.

Related Articles

२४ महिन्यांत संपादन नसेल तर आरक्षण आपोआप बाद; उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश

■ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) : सार्वजनिक प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेल्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेबाबत बॉम्बे उच्च न्यायालय यांनी महत्त्वपूर्ण निवाडा दिला आहे....

संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

■ झुंजार सेनापती l बीड  मांजरसुबा, दि. २४ (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथे यंदाही संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!