spot_img
spot_img

संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

झुंजार सेनापती l बीड 
मांजरसुबा, दि. २४ (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथे यंदाही संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सप्ताह भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान तसेच वै. ह.भ.प. शांतिब्रह्म गुरुवर्य रामहरी बाबा सुसंस्कार आश्रम यांच्या वतीने हा धार्मिक सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला आहे.
वै. ह.भ.प. शांतिब्रह्म गुरुवर्य रामहरी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ गाथाभजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन आणि ११ ते पहाटे ४ जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!