spot_img
spot_img

मद्यधुंद चालकांवर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार

परिवहन मंत्र्यांची घोषणा

■ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील महामार्गांवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने व्यापक आणि कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ठाम भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडली.
खासगी स्लीपर कोच बस अपघातांबाबत सदस्य धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. चर्चेत जयंत पाटील, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, देवयानी फरांदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. संबंधित बस पुणे नोंदणीची होती आणि प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये समृद्धी महामार्गवरील वैजापूर येथे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. २५ जणांचा बळी गेलेल्या अपघातातील चालक दारूच्या नशेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने मोठी जीवितहानी झाली.
काही खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली अनधिकृत बदल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वी एकाच स्तरावर स्लीपर व्यवस्था असायची; आता दोन स्तरांवर स्लीपर बसवले जातात. परदेशात स्लीपर कोचला बंदी असली तरी भारतात केंद्राच्या नियमांनुसार सेवा सुरू आहे. महाराष्ट्राने बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणीकृत बस येथे धावू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अपघात रोखण्यासाठी राज्यभर तपासणी नाके उभारण्यात आले असून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण एक टक्क्याने घटले असले तरी ‘शून्य अपघात’ हेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
बसचा वेग ८० किमी प्रतितास मर्यादित ठेवण्यासाठी स्पीडोमीटर सक्तीचे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही बस १२० ते १४० किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. चालकाने दारू प्यायल्यास बस सुरू होऊ न देणारी ‘ब्रेक अॅनालायझर’ यंत्रणा एसटीच्या नव्या बसमध्ये तसेच टाटा व अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या बसमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी बस चालकांनाही ही यंत्रणा बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्ते सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर, अॅरो मार्किंग, यु-टर्न व स्ट्रेट लेन दिशादर्शक फलक तसेच अंतर दर्शवणारे बोर्ड लावण्याचा आराखडा अंतिम टप्प्यात असून तो राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते आणि महापालिका क्षेत्रात लागू केला जाणार आहे.
सांगली येथील बसच्या चेसिस क्रमांकाच्या गैरवापराबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले असून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!