झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. २२ : इराण-इस्रायल युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. पुरवठा अपुरा असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता व्यक्त होत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ व रुपयाच्या अवमूल्यनामुळे येत्या काळात महागाईची मोठी लाट येण्याचा इशारा दिला आहे.



