spot_img
spot_img

राजमाता जिजाऊ’ अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण

झुंजार सेनापती l मुंबई
राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात करत ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम साधला गेला आहे. हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ यांना अभिवादन म्हणून या बससेवेला हे नाव देण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा नावांनी बससेवा सुरू करत ऐतिहासिक परंपरा जपली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही

झुंजार सेनापती l मुंबई भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सखोल तपास केला आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी...

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास कडक कारवाई

झुंजार सेनापती l मुंबई गृहराज्यमंत्री योगेश क सांगली जिल्ह्यासह तासगाव तालुक्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याविरोधात राज्य सरकारने ‘झिरो टॉलरन्स’ची ठाम भूमिका घेतली आहे. अमली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!