झुंजार सेनापती l मुंबई
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राजीनाम्यांची मालिका सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडिओ हा मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चित्रीत केल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी संबंधित तृतीयपंथी व्यक्तीच्या बाजूने खुलासा करण्यात आला असून, हा व्हिडिओ कोणी आणि का व्हायरल केला याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबतही विविध दावे समोर येत आहेत.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, येत्या काळात या प्रकरणाची चौकशी आणि राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



