spot_img
spot_img

गॅस टंचाईमुळे मद्य उद्योग संकटात

झुंजार सेनापती l मुंबई
आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा परिणाम आता मद्य उद्योगावरही दिसून येत आहे. काचेच्या बाटल्या तयार करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याने मद्यनिर्मितीवर थेट परिणाम झाला आहे. सध्या केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याने दारू पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काचेच्या बाटल्यांसह अॅल्युमिनियमच्या तुटवड्यामुळे बीअर पॅकिंगसाठी लागणाऱ्या कॅन्सचाही तुटवडा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कडक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली बीअरही मिळणे कठीण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
जर काचेच्या बाटल्यांचे उत्पादन ठप्प झाले, तर मद्य भरण्याची प्रक्रिया अडचणीत येऊन एकूणच मद्य पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

शेतरस्ता अडवला तर थेट ५ वर्षे सरकारी योजनांपासून बंदी; राज्य सरकारचा कडक निर्णय

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील शेतकरी आणि शेतीमाल वाहतुकीसाठी बारमाही रस्ते अत्यावश्यक असताना ग्रामीण भागात शेतरस्ते अडवण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य...

मंत्री झिरवाळाच्या व्हायरल व्हिडिओनंतर राजीनाम्याची जोरदार मागणी

झुंजार सेनापती l मुंबई राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राजीनाम्यांची मालिका सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!