spot_img
spot_img

बातमी प्रसिद्ध केल्याचा राग; संपादकाच्या घरावर हल्ला!

⬤ झुंजार सेनापती l बीड 

गावातील पाणीटंचाई आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात बातमी प्रसिद्ध करून प्रश्न उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक झुंजार सेनापती चे संपादक सोमनाथ पाटील यांच्या घरावर जाऊन हल्ला करण्यात आल्याची घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री तांदळवाडी घाट येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला .

पोलीस प्रशासनाची तातडीने दखल

घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेतली. पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे यांनी रात्री ११ वाजता घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

पोलीस वाहन घटनास्थळी दाखल होताच आरोपी उसाच्या शेतात पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा आहे का?

गावातील पाणीप्रश्न आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आवाज उठवल्यानंतर संपादकाच्या घरापर्यंत जाऊन हल्ला झाल्याचा आरोप गंभीर आहे. पत्रकाराने जनतेचे प्रश्न मांडायचे नाहीत का? बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकाराला लक्ष्य केले जात असेल, तर ही बाब लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

पत्रकाराच्या घरापर्यंत हल्लेखोर पोहोचत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि संपादक सोमनाथ पाटील यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

धमक्यांना भीक घालत नाही; लढा तीव्र करणार!

⬤ झुंजार सेनापती l बीड दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांच्या तांदळवाडी घाट येथील घरी १८ ऑक्टोबर रोजी रात्री हल्ला झाल्याचा आरोप करण्यात...

तांदळवाडी घाटच्या ग्रामपंचायतीचा हिशेब उघडणार!

झुंजार सेनापती lबीड : तांदळवाडी घाट येथील भीषण पाणीटंचाई आणि विशेष ग्रामसभेतील कथित अनागोंदीवरून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावर सरपंचांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!