spot_img
spot_img

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांचे अर्ज आता ऑनलाइन!

अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार

⬤ झुंजार सेनापती l डॉ.अजय सोनवणे 

राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थी-केंद्रित योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

या सुविधेमुळे लाभार्थ्यांना आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अनावश्यक कागदपत्रांची मागणी आणि प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. शासकीय डेटाबेसच्या माध्यमातून आवश्यक माहिती व प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे, योजनांचे अनुदान थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे.

ऑनलाइन अर्जासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी : https://mahadbt2.maharashtra.gov.in/

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पात्र मच्छीमार आणि मत्स्यव्यावसायिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Related Articles

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजारांचा दिलासा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  दि. ३० : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील ३०४ तालुक्यांमधील ३७ हजार...

राज्यातील १० हजार ३१२ सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानाचा लाभ!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहाय्यक परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन जमा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!