spot_img
spot_img

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजारांचा दिलासा!

३०४ तालुक्यांतील ३७ हजार ४९६ गावांचा समावेश; ९० टक्के पंचनामे पूर्ण

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  दि. ३० : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील ३०४ तालुक्यांमधील ३७ हजार ४९६ गावांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करण्यात आला असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगार, मोफत अन्नधान्य आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत ७४ टक्के धान्य वितरण पूर्ण झाले असून, २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्यात आली आहे.

जलसंधारण, नाला खोलीकरण, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा लागवडीवर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, केंद्र सरकारकडेही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासह पाणी, चारा आणि रोजगाराच्या उपलब्धतेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

Related Articles

राज्यातील १० हजार ३१२ सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानाचा लाभ!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहाय्यक परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन जमा...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांचे अर्ज आता ऑनलाइन!

⬤ झुंजार सेनापती l डॉ.अजय सोनवणे  राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थी-केंद्रित...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!