spot_img

शेत पाणंद रस्त्यांसाठी ११६ कोटींचा निधी

मंत्री भरत गोगावले यांच्या निर्देशानंतर तातडीची कार्यवाही

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांसाठी राज्य रोजगार हमी योजनेतून पूरक कुशल अनुदानापोटी ११६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी दूर करण्यासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते.
त्यानुसार शासनाने ११६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही निधी उपलब्ध होताच तो तातडीने वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भरत गोगावले यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, ग्रामीण विकासकामे थांबणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा !

⬤ झुंजार सेनापती l बीड : गावात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला कामाला लावणाऱ्या गवारी येथील अनिल लोमटे (वय ३५) याच्याविरुद्ध नेकनूर...

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेप

⬤ झुंजार सेनापती l मुंबई वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी विस्तारल्या असून, महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधिक भक्कम...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!