spot_img

दीपावलीनिमित्त राज्यपालांची विविध मान्यवरांनी घेतली भेट; दिल्या शुभेच्छा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

दीपावली निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमिन पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुरेश गोसावी, प्रकुलगुरु डॉ पराग काळकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर व अभिनेत्री पूनम धिल्लो यांनी राज्यपालांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या एस. जी. बर्वे दिव्यांग मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या व भेटवस्तू दिल्या.रा.स्व. संघाचे परळ विभाग प्रांत संघचालक रविंद्र संघवी, सैफी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शकील सैफी, रेडिओलॉजिस्ट डॉ राहुल सावजी, ब्रह्मकुमारी रुक्मिणी व इतर ब्रह्मकुमारी, बॉबकार्डचे विधी व कॉर्पोरेट सामाजिक दायित्व जबाबदारी प्रमुख विपुल बारोट,  पत्रकार भीमराव धुळप, द योग इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी योगेंद्र  आदींनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. 

Related Articles

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावर

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही स्थापन करण्याचा...

एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती २०२७ पर्यंत लांबणीवर!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!