spot_img

दुष्काळी जतला दिलासा; म्हैसाळच्या आवर्तनात तलाव भरणार!

- चंद्रकांत पाटील

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील ३०५ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले असून, सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा त्यात समावेश आहे. या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव योगाश्रमात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी दिवाळी फराळाचाही आनंद घेतला.

पीक पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. मात्र, तोपर्यंत दिवाळीचा सण साजरा करता यावा, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करायचा असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाची कामे, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योजनेतील कामांना गती देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. पाण्याची गरज भासल्यास मागणी करणाऱ्या गावांना टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनात जत तालुक्यातील तलाव प्राधान्याने भरून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फराळाचे वाटप केले. त्यांच्या अडचणी जाणून घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. यावेळी आमदार धैर्यशील कदम, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आता पालावरच शाळा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर पोहोचत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगारांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी...

शेताच्या बांधावर पोहोचून मुख्यमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!