spot_img
spot_img

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीसांचे निर्देश

 झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टीधरणातील पाणी साठेपिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारआपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजनमहिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेक्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणेरोजगार हमी मंत्री भरत गोगावलेमत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.

राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

सचेत‘ प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वारे पाऊसवीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून १९ कोटी २२ लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे श्रीमती सेठी यांनी सांगितले.

राज्यात वीज पडूनभिंत कोसळूनझाड पडूनपाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा अकरा टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहेतथापि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

Related Articles

Een uitgebreide gids voor circus casino belgique en zijn unieke bonusaanbiedingen

In deze gids nemen we je mee in de wereld van circus casino belgique, met een focus op zijn unieke bonusaanbiedingen en wat dit...

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!