spot_img
spot_img

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

अदानीकरणाचा डाव हाणून पाडणार' कृती समिती आक्रमक

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्वाणीचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला आहे.
मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेसह विविध कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व, कामगारांचे हक्क तसेच आजी-माजी कर्मचारी आणि वेटलिज कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, विविध प्रश्नांवर सरकारला वारंवार निवेदने देऊनही केवळ आश्वासनांचीच खैरात करण्यात आली. प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय न घेता कामगारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला. बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याऐवजी त्याचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही करण्यात आली.
सरकार आणि अदानी समूहातील कथित संगनमतामुळे बेस्टच्या मालमत्ता आणि डेपो खासगी हातात देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला. धारावी डेपोची सुमारे ११.५ एकर जागा अदानी समूहाला देण्यात आली असून त्याबदल्यात बेस्टला देण्यात येणाऱ्या सहा एकर जागेबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
बेस्टचे डेपो ‘पीपीपी’ तत्त्वावर खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा डाव असल्याचा आरोप करत याला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचे समितीचे पदाधिकारी आणि अॅड. उदय आंबोणकर यांनी स्पष्ट केले. बेस्टचे अस्तित्व आणि मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!