spot_img
31.2 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

spot_img

महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करणार

मुंबई शहरातील महिलांसाठी सर्वसमावेशक ॲप तयार करण्याचे निर्देश

झुंजार सेनापती l मुंबई

चौथे महिला धोरण २०२४ जाहीर झाले असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी प्रभावीपणे काम करावे. या धोरणाच्या माध्यमातून राज्य शासन महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत आहे. मुंबई शहरातील महिलांसाठी असलेल्या योजनांबाबत एकाच ठिकाणी माहिती मिळण्यासाठी एक नवीन ॲप तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 चौथे महिला धोरण -२०२४ जिल्हास्तरीय अंमलबजावणी सुकाणु समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधानसचिव नविन सोना,जिल्हाधिकारी आंचल गोयलअपर जिल्हाधिकारी रवि रतन कटकधोंड,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरेउपजिल्हाधिकारी महादेव किरवले,समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटीलसहायक आयुक्त, कौशल्य विकास, मुंबई शहर शैलेश भगतमुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमुंबई शहरातील लोकसंख्या लक्षात घेवून येथील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेललहान मुलांसाठी पाळणाघरझोपडपट्टी भागात तसेच इतर गरजू महिला असतील त्या ठिकाणी महिला बचत गट स्थापन करणेबचतगटांना रोटेशन पध्दतीने स्टॉल उपलब्ध करून देणेमहिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी पर्यटनाचे प्रकल्प विकसित करणेमहिला मच्छिमारांसाठी शासकीय योजना राबविणे यावर भर देण्यात यावा. आदिवासी महिलांसाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात. घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण करणेमहिलांना आरोग्य सुविधा तत्काळ देणे तसेच काळानुरूप आरोग्य सुविधा वाढविणे याबाबत काम करावे. शासन आपल्या दारीमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनालखपती दीदी योजनामुलींना मोफत उच्च शिक्षण देणे यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमहिला हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाकडून राबविण्यात येणा-या सुरक्षा तसेच इतर महत्वपूर्ण योजना एकाच ॲपवर उपलब्ध होतील यासाठी मुंबई शहरसाठी ॲप विकसित करून ते ॲप सर्व महिलापर्यंत पोहोचवा.  शासनाकडून महिलांच्या मदतीसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना तत्काळ पोहोचवाव्यात. हेल्प डेस्कची व्याप्ती वाढवा,हिरकणी कक्ष नियमित सुरू ठेवामहिला समुपदेशन केंद्रात तत्काळ समुपदेशन केले जावेवन स्टॉप सेंटरमध्ये महिलांना सुविधा द्याव्यात. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तक्रार देताना महिलांना आधार वाटला पाहिजे. त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार दाखल करावी अशा प्रकारचे वातावरण पोलीस स्टेशनमध्ये असावे. शासन महिलांच्या बाबतीत आलेल्या तक्रारी फास्ट ट्रॅकवर घेत आहे. राज्याला एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महिलांचाही मोठा वाटा असणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने काम करावे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यात चौथे महिला धोरण २०२४ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी चौथे महिला धोरण-२०२४ संदर्भात जिल्हास्तरीय सुकाणू समिती करत असलेल्या कामाचे सादरीकरण केले.

महिला व बालविकास विभागआरोग्य विभागकौशल्य विकास विभागमहिला बालविकास प्रकल्प अधिकारीपोलीस प्रशासन यांच्याकडून मुंबई शहर मध्ये राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांची यावेळी माहिती देण्यात आली.

Related Articles

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

शासकीय जमिनींच्या नियमांमध्ये विशिष्ट कार्यप्रणाली आणणार

झुंजार सेनापती l मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था अथवा कृषी, वाणिज्यिक, औद्योगिक व रहिवासी प्रयोजनासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत. अशा शासकीय जमिनींचे वर्गीकरण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!