spot_img
spot_img

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील वय १८ वर्षापेक्षा जास्त असलेल्या आणि वय ५० पेक्षा कमी असलेल्या अर्जदारांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बँकेकडून मंजूर होणाऱ्या अनुदान योजनेंतर्गत उपनगर ५० व शहर ५० चे उद्दिष्ट (५० हजार रुपये पर्यंतचे), बीजभांडवल योजनेअंतर्गत उपनगर ५० व शहर ५० चे उद्दिष्ट (५०,००१ ते ७.०० लाख रुपये पर्यंत) व थेट कर्ज योजनेतंर्गत उपनगर ५० व शहर ५० उद्दिष्ट (१ लाख पर्यंतचे), मुंबई शहर-उपनगर जिल्हा करिता प्राप्त आहे.

इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई – ४०० ०५१ या पत्त्यावर किंवा ०२२-३५४२४३९५ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


 

Related Articles

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २६ : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू असलेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात...

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!