spot_img
spot_img

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ॲपेक्स लेव्हल मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन संदर्भात चर्चा

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग – इन – चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ(पीव्हीएसएम) (एव्हीएसएम)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट ॲपेक्स लेव्हल मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन परस्पर संवादाच्या अनुषंगाने झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लष्कराचे दक्षिण विभाग प्रमुख यांच्यात नागरी संरक्षणअंतर्गत सुरक्षाआपत्ती व्यवस्थापनराज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि माजी सैनिकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या भेटीदरम्यान लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योग विभागाचे सचिव पी.अन्बलगन उपस्थित होते.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!