spot_img
spot_img

प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर राज्य सरकारचे निर्बंध

डेकोरेटर्स-मॅरेज हॉल्सवर कारवाईचा इशारा

झुंजार सेनापती | मुंबई | २७ फेब्रुवारी
बायोडिग्रेडेबल नसलेल्या साहित्यापासून तयार होणाऱ्या कृत्रिम फुलांच्या वापरावर राज्य सरकार कठोर पावले उचलणार असून यासंदर्भातील स्पष्ट शासन निर्णय (जीआर) लवकरच जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स तसेच अशा फुलांनी सजावट करणारे मोठे मॅरेज हॉल्स यांच्यावरही कारवाईचा समावेश या निर्णयात असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत सदस्य विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुले व प्लास्टिक वस्तूंच्या उत्पादन, विक्री आणि वापराबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत आहे. प्लास्टिक व रासायनिक घटकांमुळे निर्माण होणारा कचरा विघटनशील नसल्याने तो दीर्घकाळ पर्यावरणात राहतो. शिवाय, कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटत असून त्याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे पर्यावरण विभाग आवश्यक ती कठोर पावले उचलेल आणि गरज पडल्यास इतर विभागांचाही समन्वय साधला जाईल.
दादर फूल मार्केट बंद होणार नाही
मुंबईतील दादर फूल मार्केट बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण कारवाईदरम्यान काही गैरसमज निर्माण झाले असावेत, मात्र फूल मार्केट सुरळीत सुरू राहील यासाठी महानगरपालिकेला तातडीचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन, स्थानिक फूल उत्पादकांचे हित आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन या तिन्ही बाबींचा विचार करूनच पुढील धोरण ठरवले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
४१३५ टन प्लास्टिक जप्त; २५ कोटींचा दंड
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री Pankaja Munde यांनी चर्चेत सांगितले की, राज्यात बायोडिग्रेडेबल नसलेल्या प्लास्टिक वस्तूंवर आधीपासून बंदी लागू आहे. कृत्रिम फुलांमध्ये वापरले जाणारे रसायन मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
आतापर्यंत ४१३५ टन प्लास्टिक कचरा जप्त करण्यात आला असून सुमारे २५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ९२ हजार ठिकाणी नियमभंगाच्या घटना नोंदवण्यात आल्या असून दोषींवर दंडात्मक व शिक्षेची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पर्यावरणपूरक सजावटीस प्रोत्साहन
लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पर्यावरणपूरक सजावट, पुनर्वापरयोग्य साहित्य आणि नैसर्गिक फुलांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. लवकरच या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना व अंमलबजावणी यंत्रणा जाहीर केली जाणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक रंगांच्या वापराबाबतही जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
या चर्चेत सदस्य जयंत पाटील आणि प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Ontdek de voordelen van spelen bij het betrouwbare Lalabet casino Nederland

In dit artikel verkennen we de vele voordelen van het spelen bij het betrouwbare Lalabet casino Nederland. Van de gebruiksvriendelijke interface van de lalabet...

राज्यातील प्रत्येक शाळेत ‘परिवहन समिती’ स्थापन करणार

झुंजार सेनापती l प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता प्रत्येक शाळेत ‘परिवहन समिती’ स्थापन करणे बंधनकारक करण्यात येणार आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!