spot_img
spot_img

महसूल विभागात महाघोटाळा! दोन लाख शेतकऱ्यांचे सातबारा परस्पर बदलले

विधान परिषदेत मंत्र्यांची कबुली

झुंजार सेनापती l मुंबई 
राज्यात महसूल विभागातील सातबारा फेरफार प्रकरणामुळे मोठा घोटाळा उघडकीस आला असून तब्बल दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये परस्पर बदल करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली असून याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत माहिती दिली.
या प्रकरणाचा मुद्दा शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील तपासणीत ३८ हजार २७ प्रकरणांमध्ये फेरफार झाल्याचे आढळले आहे. या प्रकरणात महसूल विभागातील २४७ अधिकारी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
सातबारा उताऱ्यातील नावातील दुरुस्ती, नोंदीतील फेरफार किंवा शुद्धलेखन दुरुस्ती करण्यासाठी असलेल्या कलम १५५ चा गैरवापर करून काही अधिकाऱ्यांनी जमीन मालकीत बदल केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी धनिक आणि बिल्डरांच्या नावे वळवल्या गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सात दिवसांत सुरू केली जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील जमीन नोंदी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!