spot_img
spot_img

शासकीय वसतिगृह प्रवेशाची मुदत वाढली; विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

झुंजार सेनापती l मुंबई

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरळितपणे राबविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई शहर व उपनगरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुलांचे शासकीय वसतिगृह, मुंबई शहरसाठी वाशी, नवी मुंबई येथे  तर मुंबई उपनगरसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृह योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत निवासासोबत भोजन भत्ता व निर्वाह भत्ता देण्यात येतो. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गातील १२ वीनंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यामधील उच्च शिक्षण घेणाऱ्या मात्र शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वीनंतर पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास पोर्टल सुरू केले आहे. मात्र पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.ऑफलाईन अर्जाचा नमुना सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई, ४०००७१ येथे उपलब्ध आहे. मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑफलाइन अर्ज करून शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर, उपनगरच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

Related Articles

Tuuri casino kokemuksia: mitä pelaajat sanovat tästä suositusta kasinosta

Tässä artikkelissa tarkastelemme tuuri casino -kasinon tarjoamia kokemuksia pelaajien näkökulmasta. Käymme läpi kasinoon liittyviä arvosteluja, bonuksia, pelivalikoimaa sekä kotiutusprosessia. Erityisesti keskitymme siihen, mitä pelaajat...

A Closer Look at Casinova Casino Reviews and User Feedback

In this article, we delve into the world of Casinova Casino, exploring user reviews and feedback to determine what makes this online gaming platform...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!