spot_img
spot_img

तांदळवाडी घाटच्या ग्रामपंचायतीचा हिशेब उघडणार!

माहिती अधिकारातून विकासकामे, निधीची माहिती मागवली

झुंजार सेनापती lबीड : तांदळवाडी घाट येथील भीषण पाणीटंचाई आणि विशेष ग्रामसभेतील कथित अनागोंदीवरून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावर सरपंचांनी अपमानास्पद उत्तर दिल्याचा आरोप करत एका जागरूक नागरिक आणि पत्रकाराने थेट माहिती अधिकाराचे हत्यार उपसले आहे.
विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील ग्रामसभांचे इतिवृत्त, विकासकामे, शासकीय निधीची बिले आणि लेखापरीक्षण अहवालांची माहिती मिळविण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती बीड यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.
विशेष ग्रामसभेपूर्वी कोऱ्या कार्यवृत्त नोंदवहीवर सह्या घेतल्याचा तसेच महत्त्वाच्या सभेला उपसरपंच आणि ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
“मतदान केले नाही म्हणून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नाही का?” असा सवाल उपस्थित करत संबंधित पत्रकाराने आपल्या सुरक्षिततेच्या चिंतेबाबत पोलीस अधीक्षक, बीड यांनाही लेखी निवेदन दिल्याचे सांगितले.
आता माहिती अधिकारातून कोणती कागदपत्रे समोर येतात, ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वास्तव काय आहे आणि गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा विनियोग कसा झाला, याकडे तांदळवाडी घाट ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

धमक्यांना भीक घालत नाही; लढा तीव्र करणार!

⬤ झुंजार सेनापती l बीड दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांच्या तांदळवाडी घाट येथील घरी १८ ऑक्टोबर रोजी रात्री हल्ला झाल्याचा आरोप करण्यात...

बातमी प्रसिद्ध केल्याचा राग; संपादकाच्या घरावर हल्ला!

⬤ झुंजार सेनापती l बीड  गावातील पाणीटंचाई आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात बातमी प्रसिद्ध करून प्रश्न उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक झुंजार सेनापती चे संपादक सोमनाथ पाटील यांच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!