spot_img

एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती २०२७ पर्यंत लांबणीवर!

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रवास सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची १०० टक्के नोंदणी आणि स्मार्ट कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने निश्चित केले आहे. त्यामुळे महिलांनी मुदतवाढीचा लाभ घेत स्मार्ट कार्डची नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी...

बीडीडी चाळ पुनर्विकासात गुणवत्तेशी तडजोड नाही; प्रकल्प वेळेत पूर्ण करा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वेळेत आणि पूर्ण गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!