spot_img

जगाला विकासाचा नवा मार्ग दाखविण्याची भारतावर जबाबदारी

– सरसंघचालक डॉ मोहन भागवत

⬤ झुंजार सेनापती l नागपूर 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विकासाच्या संकल्पनेला व्यापक दृष्टिकोन देण्याची गरज व्यक्त केली. निसर्गासह आपण सर्वजण एकाच विश्वाचे घटक आहोत, त्याचे मालक नाही. त्यामुळे मानवाने निसर्गावर वर्चस्व गाजविण्याऐवजी परस्परावलंबनाची जाणीव ठेवून जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

केवळ स्वतःच्या हिताचा विचार न करता सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारी जीवनदृष्टी विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात संयम आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत. आजच्या जगाला विकासाचा नवा मार्ग दाखविण्याची गरज असून, संपूर्ण विश्व त्या दृष्टीने भारताकडे आशेने पाहत आहे, असे भागवत म्हणाले.

रामटेक तालुक्यातील कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते 

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह मेघे कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज

⬤ झुंजार सेनापती l नागपूर विदर्भात दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी मोठी संधी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज आहे....

आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्या!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!