spot_img

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची पंचदीप बालग्रामला सदिच्छा भेट!

⬤ झुंजार सेनापती l पनवेल : महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि त्यांचे पती, नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पनवेल येथील खांदा कॉलनीतील ‘पंचदीप बालग्राम संकुला’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी बालगृहातील मुलांशी संवाद साधत त्यांनी मुलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी बालगृहातील मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांची आस्थेने चौकशी केली. मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, बालगृहात पूर्वी वास्तव्यास असलेल्या वैजयंती कदम हिने कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे, पंचदीप बालग्रामच्या कार्याध्यक्ष मीनल टिपणीस यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि बालगृहातील मुले उपस्थित होती.

Related Articles

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढविण्याची गरज

⬤ झुंजार सेनापती l नागपूर विदर्भात दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी मोठी संधी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशी गोवंशाचे संवर्धन आणि दूध उत्पादन वाढविण्याची गरज आहे....

जगाला विकासाचा नवा मार्ग दाखविण्याची भारतावर जबाबदारी!

⬤ झुंजार सेनापती l नागपूर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विकासाच्या संकल्पनेला व्यापक दृष्टिकोन देण्याची गरज व्यक्त केली. निसर्गासह आपण सर्वजण एकाच...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!