spot_img
spot_img

मुख्यमंत्री करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार 16 जून, 2025 रोजी शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक  शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक 23, किसन नगर, ठाणे तसेच शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळा, आंध्रा हायस्कूल जवळ, वडाळा या शाळेत उपस्थित राहतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे भेट देतील.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, ता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिली आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!