spot_img

महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्ससह नवीन रुग्णवाहिका सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार!

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांसाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत एसओपी तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शासनाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून या समितीची अधिकृत स्थापना केली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी परिवहन आयुक्त कार्यालयातील अपर परिवहन आयुक्त  रवी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयातील पोलीस अधीक्षक  सुनील भारद्वाज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक  जयंत मुळे आणि परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद तावडे यांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षाचे परिवहन उपायुक्त सचिनकुमार गिरी हे समितीचे सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याची जबाबदारी

महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स तसेच नवीन ॲम्ब्युलन्स सेवांबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. समितीने विविध बाबींचा अभ्यास करून शासनाला आवश्यक त्या शिफारशींसह अहवाल सादर करायचा आहे. शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत हा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या निर्णयामुळे राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवांच्या नियोजनबद्ध संचालनासाठी एकसमान प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

Related Articles

जलयुक्त शिवार ३.० मधून १८ हजार गावे जलसमृद्ध करणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून ग्रामीण भाग जलसमृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार ३.० अभियानाच्या माध्यमातून राज्यातील १८ हजार गावांना जलसमृद्ध...

एमएसएमई उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!