spot_img
spot_img
spot_img

अजितदादा अनंतात विलीन; बारामतीत लोटला लाखोंचा जनसागर

अवघा महाराष्ट्र हळहळला

झुंजार सेनापती l बारामती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने झालेल्या या अंत्यविधीवेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता.

पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली असून आकाशात बंदुकीच्या तीन फैरी झाडून अजित पवारांना अखेरचा सलाम करण्यात आला. थरथरत्या हातांनी आणि अश्रूंनी डोळे भरून आलेल्या अवस्थेत त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
अजितदादा अनंतात विलीन झाले असले, तरी त्यांच्या जाण्याने उपस्थितांच्या मनात प्रचंड पोकळी निर्माण झाली. अंत्यसंस्कारावेळी ‘एकच वादा अजितदादा’, ‘अजितदादा परत या’, ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिला.
यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, हुंदके आणि आक्रोश पाहायला मिळाला. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राने आज आपल्या एका बुलंद नेतृत्वाला अश्रूंनी निरोप दिला.

Related Articles

टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून...

अजित पवारांचा अपघात संशयाच्या भोवऱ्यात

झुंजार सेनापती l मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. मात्र...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!