spot_img
spot_img
spot_img

मुंबईत सत्तेचा नवा फॉर्म्युला; दर सव्वा वर्षांनी महापौर बदलणार

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रितू तावडे होणार महापौर

मुंबई  l झुंजार सेनापती

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी महायुतीने अनोखा फॉर्म्युला राबवला आहे. दर सव्वा वर्षांनी महापौर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रितू तावडे यांची महापौरपदासाठी निवड निश्चित करण्यात आली आहे. उपमहापौरपदी संजय घाडी यांचे नाव जाहीर झाले आहे.
महापौर-उपमहापौर निवडीची औपचारिक घोषणा ११ फेब्रुवारी रोजी होणार असून १६ फेब्रुवारीला विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. त्यानंतर शिक्षण समिती व स्थायी समिती अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
महायुतीच्या नेत्यांची सकाळी बैठक पार पडली. भाजपाकडून मंगलप्रभात लोढा, अमित साटम तर शिंदे सेनेकडून शीतल म्हात्रे यांसह प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर उमेदवारीची घोषणा करण्यात आली. मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना मराठी महापौर दिल्यामुळे आम्ही कोणताही अपशकून करणार नाही, असे सांगितले.
दरम्यान, शिंदे सेनेत नाराजीचे सूर उमटल्याची चर्चा आहे. काही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याची खदखद व्यक्त होत असून या नाराजीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालत असल्याची माहिती आहे.
५३ वर्षीय रितू तावडे या मराठा समाजातून निवडून आलेल्या भाजपाच्या युवा महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांची नगरसेवक म्हणून ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्या शिक्षण समिती अध्यक्ष तसेच मुंबई उपनगरे स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.

Related Articles

“उद्योजकांना त्रास दिला तर ठोकून काढा!”

झुंजार सेनापती l प्रतिनिधी दावोस येथील २०२५ च्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेत झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारातून उभा राहिलेला ‘तौरल इंडिया’ प्रकल्प वर्षभरातच साकार झाला...

मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का?

 मुंबई l झुंजार सेनापती  अजित दादा पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!