spot_img
spot_img

“उद्योजकांना त्रास दिला तर ठोकून काढा!”

सुप्यातून मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

झुंजार सेनापती l प्रतिनिधी

दावोस येथील २०२५ च्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेत झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारातून उभा राहिलेला ‘तौरल इंडिया’ प्रकल्प वर्षभरातच साकार झाला असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला. “उद्योजकांना कोणी त्रास दिला तर त्यांना ठोकून काढा… म्हणजे कायद्याने ठोकून काढा. कायदा-सुव्यवस्था राखून उद्योजकांना संरक्षण द्या,” असे धडाकेबाज विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी काही क्षण चुळबूळ निर्माण झाली.
मुख्यमंत्री म्हणाले, सुपा MIDCमधील हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे. एवढा मोठा उद्योग येथे उभारला जाणे ही आनंदाची बाब आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. या कंपनीमुळे आतापर्यंत परदेशातून आयात करावा लागणारा माल आता देशातच तयार होणार असून, हा भारताच्या औद्योगिक शक्तीचा आविष्कार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र अर्थव्यवस्थेला गती देणारे केंद्र आहे आणि त्यात महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत असल्याचेही ते म्हणाले. दावोस २०२५ परिषदेत झालेले ७५ करार प्रत्यक्षात उतरले असून, त्यापैकी आजचा हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.सुपा (ता. पारनेर) : दावोस येथील २०२५ च्या जागतिक गुंतवणूक परिषदेत झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराचे प्रत्यक्ष रूपांतर करत सुपा MIDCमध्ये उभारलेला ‘तौरल इंडिया’चा महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प आज सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाला ठाम संदेश दिला. “उद्योजकांना कोणी त्रास दिला तर त्यांना ठोकून काढा… म्हणजे कायद्याने ठोकून काढा. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून उद्योगांना पूर्ण संरक्षण द्या,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने काही क्षण कार्यक्रमस्थळी खळबळ उडाली.
मुख्यमंत्री म्हणाले, सुपा MIDCमध्ये उभा राहिलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या उद्योगामुळे परदेशातून आयात होणारा माल आता देशातच तयार होणार आहे. त्यामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीबरोबरच भारताच्या उत्पादन क्षमतेलाही मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचा उल्लेख करत, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख इंजिन असून महाराष्ट्र या क्षेत्रात आघाडी घेत आहे, असेही ते म्हणाले.
दावोस २०२५ परिषदेत झालेल्या करारांपैकी ७५ प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाले असून, सुप्यातील आजचा प्रकल्प हा त्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!