spot_img
spot_img
spot_img

मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच वंदे मेट्रोच्या अत्याधुनिक एसी लोकल ट्रेन

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी लोकल सेवेच्या आधुनिकीकरणाला वेग आला असून लवकरच वंदे मेट्रोच्या अत्याधुनिक एसी लोकल गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २३८ नव्या रेकसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून हा प्रकल्प लोकल प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा ठरणार आहे.
एमयूटीपी टप्पा-३ आणि ३-अ अंतर्गत या गाड्या सेवेत आणल्या जाणार असून पुढील ३५ वर्षांच्या देखभालीची जबाबदारीही करारात समाविष्ट करण्यात आली आहे. वंदे मेट्रो रेक इंटर-कार गँगवे आणि वॉक-थ्रू डिझाइनसह तयार होणार असल्याने डब्यांतील गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
नव्या लोकलमध्ये उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा, आरामदायी मॉड्युलर आसने, दिव्यांग व व्हीलचेअर प्रवाशांसाठी राखीव जागा आणि मोठ्या खिडक्या अशी आधुनिक सुविधा असणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि प्रवासी-केंद्रित होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कराराला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील अडीच वर्षांत पहिली प्रोटोटाइप ट्रेन दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व २३८ गाड्या मुंबईत पूर्णपणे दाखल होण्यासाठी अंदाजे सहा वर्षांचा कालावधी लागू शकतो. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १२, १५ आणि १८ डब्यांच्या गाड्यांचा समावेश असणार असून वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून कर्जत आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दोन नवीन मेगा देखभाल डेपो उभारले जाणार आहेत. मुंबईच्या लोकल व्यवस्थेत यामुळे तांत्रिक आणि सेवा गुणवत्तेचे नवे पर्व सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील काळाच्या पडद्याआड

झुंजार सेनापती l मुंबई मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव फॉर्च्युनर कारने ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज संभाजी...

एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक

झुंजार सेनापती l मुंबई  वेतनवाढीचा फरक आणि थकीत मासिक भत्त्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!